Press "Enter" to skip to content

“एक राखी सैनिकांसाठी ” महापालिकेच्या शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम !

“एक राखी सैनिकांसाठी ” महापालिकेच्या शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

पनवेल, प्रतिनिधी : रक्षाबंधनाचे औचित्य साधून ” एक राखी सैनिकांसाठी ” हा नाविन्यपूर्ण उपक्रम पनवेल महानगरपालिकेच्या शा. क्र. ०५, जीवन शिक्षण विद्यामंदिर मोठा खांदा येथे घेण्यात आला.

आयुक्त श्री. गणेशजी देशमुख यांच्या संकल्पनेतून अतिरिक्त आयुक्त श्री. भारत राठोड व सहाय्यक आयुक्त सुवर्णा देखणे यांच्या प्रेरणेने तसेच प्रशासन अधिकारी किर्ती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांच्या प्रति आदर व स्नेह व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शाळा क्रमांक ०५, जीवन शिक्षण विद्यामंदिर मोठा खांदा शाळेतील सर्व विद्यार्थीनींनी व शिक्षकांनी स्वत: राख्या तयार केल्या.मुख्याध्यापिका शुभा आवाड , सर्व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या. सदर उपक्रमास विशेष सहकार्य व समन्वय शाळेतील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश रामचंद्र आलदर यांनी केले.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published.