लोकनेते दि बा पाटील चळवळ
स्पर्धा पोहचली पनवेल नगरीत !
कामोठे येथील शाळेत दिबां`चा जयघोष !
लोकनेते दि बा पाटील चळवळ स्पर्धेच्या प्रचारार्थ
चळवळ समितीची कामोठे येथील शाळेला भेट !
पनवेल, प्रतिनिधी : शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे नेते, क्रांतिपुत्र तथा लोकनेते दि बा पाटील यांचे कार्य विविध स्पर्धाच्या माध्यमातून सर्व समाजाला कळावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दि बा पाटील : एक चळवळ ! या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी स्पर्धेचे आयोजक असलेल्या नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेने शनिवारी कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते दि बा पाटील हायस्कुलला भेट दिली.
यावेळी स्पर्धा समितीचे संयोजक जेष्ठ कवी, साहित्यिक, नाटककार व स्पर्धा संयोजन समिती सदस्य गज आनन म्हात्रे, लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती सदस्य तथा २९ गाव संघर्ष समिती, नवी मुंबई अध्यक्ष दिपक पाटील, आयोजक संस्थेचे प्रवक्ते तथा सक्रिय सदस्य विमानतळ नामकरण चळवळ शैलेश घाग, उपाध्यक्ष – २९ गाव संघर्ष समिती, नवी मुंबई उपाध्यक्ष प्रताप पाटील, कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक व जेष्ठ पत्रकार सुरेशजी पाटील यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना दि बा चळवळ स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते दि बा पाटील हायस्कूलचे प्राचार्य सुरेश चाळके यांनी समितीचे स्वागत घेतले. लोकनेते दि बा पाटील यांच्या कार्याच्या गौरवार्थ आयोजित केलेल्या स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले. कामोठे येथील शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतील असे आयोजकांना आश्वासित केले.
संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी पनवेल, उरण आणि नवी मुंबईतील विद्यार्थी, शिक्षक, दिबा प्रेमीनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. भूमिपुत्र, शेतकरी, कामगार, कष्टकरी समाजाचे स्फूर्तीस्थान तथा लोकनेते दि बा पाटील यांचे कार्यकतृत्व संपूर्ण जगाला कळावे, या उद्देशाने नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दि बा पाटील चळवळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 8850315795/9821196575/ 9004329457 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक संस्थेचे प्रवक्ते तथा विमानतळ नामकरण चळवळ सक्रिय सदस्य शैलेश घाग यांनी केले आहे.
p7axyy