Press "Enter" to skip to content

विद्यापीठ सी-झोन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा ! एस. जी. जी. एस. पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षद वाघमारेला ‘बॉक्सिंग’मधे सुवर्णपदक !

नांदेड : मालेगाव रोडवरील नांदेडच्या श्री गुरू गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षद वाघमारे याने सी-झोन आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांना विद्यापीठ परीक्षेतल्या नांदेडसह लातूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गेल्या १ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या बॉक्सिंग या खेळ प्रकारात याने ७० ते ७५ वजन गटात सुवर्णपदक पटकावले. हर्षद वाघमारे हा विद्यार्थी येत्या १४ व १५ डिसेंबर रोजी परभणी येथे होणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘सेंटर झोन’ बॉक्सिंगच्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत उतरणार आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम, संस्थेचे सचिव आनंद भोरगे, प्रा. डॉ. देवदत्त देशपांडे, प्रा. अमोल धुळे, प्रा. विपीन कदम, प्रा. संजय नरवाडे, प्रा. डॉ. दिलीप शिंदे, प्रा. शुद्धोधन एडके, प्रा. जगदीश केंद्रे आदींनी त्याचे स्वागत केले आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »