नवीन पनवेल शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे ना.सुभाष देसाईंच्या हस्ते भव्य उद्घाटन !
पनवेल : नवीन पनवेल शहर शिवसेना शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी ०६ वाजता शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा उद्योग व खनिकर्म मंत्री (महाराष्ट्र राज्य) ना.सुभाष देसाई यांच्या हस्ते तर मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल आणि उपमहानगर प्रमुख-पनवेल/नवीन पनवेल यतीन देशमुख यांनी केले आहे. यावेळी बहुजन समाज पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष शंकर सोनवले यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे शिवबंधन मनगटावर बांधले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेल्या नेत्यांमध्ये बबनदादा पाटील (रायगड जिल्हा सल्लागार), सौ.रेखाताई ठाकरे(रायगड जिल्हा संघटिका), श्री.रमेश गुडेकर(रायगड जिल्हा सल्लागार), मयुर जोशी(जिल्हा अधिकारी युवासेना), शिरीष बुटाला (रायगड जिल्हा सल्लागार), सौ.कल्पना पाटील (उपजिल्हा संघटिका पनवेल), श्री.रामदास पाटील (उपजिल्हाप्रमुख रायगड), सौ.रेवती सकपाळ (विधानसभा संघटिका पनवेल), श्री.परेश पाटील (उपजिल्हा संघटक पनवेल), अवचित राऊत(उपजिल्हा अधिकारी युवासेना), भरत पाटील (तालुका संघटक पनवेल), सौ.मेघा दमडे (तालुका संघटिका पनवेल-ग्रामीण), दिपक निकम (विधानसभा संघटक पनवेल), सौ.अनीता डांगरकर(तालुका संघटिका पनवेल-ग्रामीण), रामदास शेवाळे (महानगरप्रमुख पनवेल), अॅड.सौ.शुभांगी शेलार(महानगर संघटिका पनवेल महानगर), एकनाथ म्हात्रे (तालुका प्रमुख पनवेल-ग्रामीण), सौ.सुजाता कदम(तालुका संघटिका), ज्ञानेश्वर बडे (तालुका प्रमुख-पालीदेवद,पळस्पे,कोन,पनवेल), सौ.प्रमिला कुरघोडे (तालुका संघटिका), प्रदिप ठाकूर (विधानसभा समन्वयक पनवेल), सौ.प्रतिभा सावंत (तालुका संपर्क संघटिका), गुरुनाथ पाटील (महानगर समन्वयक पनवेल महानगर), सौ.सुनंदा पाटील (उपतालुका संघटिका), प्रथमेश सोमण (महानगर संघटक), सौ.टीया धुमाळ (उपतालुका संघटिका), शांताराम कुंभारकर (उपतालुका प्रमुख), नितीन पाटील(जिल्हा समन्वयक युवासेना), बबन फडके (उपतालुका प्रमुख), केवल माळी (युवसेना तालुका अधिकारी), विष्णू लहाने (उपतालुका प्रमुख), पराग मोहिते (विधानसभा अधिकारी युवासेना), अबासो लकडे (उपतालुका संघटक), सौ.योगिता पाटील(उपजिल्हा अधिकारी युवतीसेना), दिपक घरत (उपमहानगर प्रमुख – खारघर), सौ.संचिता राणे (उपमहानगर संघटिका खांदा कॉलनी), कैलाश पाटील (उपमहानगर प्रमुख-कळंबोली/तळोजा), सौ.रीना पाटील (उपमहानगर संघटिका खारघर), रामदास गाँधळी (उपमहानगर प्रमुख-खांदा कॉलनी), सौ.रूही सुर्वे (शहर संपर्क संघटिका पनवेल), प्रभाकर गोवारी (उपमहानगर प्रमुख-कामोठे), सौ.नंदा चेडे (शहर संपर्क संघटिका खारघर), सी.पी.प्रजापती (उ.भा.सेल तालुका अध्यक्ष), सौ.मीना सदरे (शहर संपर्क संघटिका कामोठे), प्रकाश गायकवाड (शहर प्रमुख खारघर), सौ.अर्चना कुलकर्णी (शहर संघटिका पनवेल), राकेश गोवारी (शहर प्रमुख कामोठे), सौ.सुलक्षणा जगदाळे (शहर संघटिका कामोठे), सदानंद शिर्के (शहर प्रमुख खांदा कॉलनी), सौ.सानिका मोरे (शहर संघटिका खांदा कॉलनी), श्री.डी.एन मिश्रा (शहर प्रमुख कळंबोली), सौ.ज्योती मोहिते (शहर संघटिका कळंबोली), प्रदिप केणी (शहर प्रमुख तळोजे), सौ.पारुल सूर्यवंशी (शहर संघटिका खारघर), प्रवीण जाधव (शहर संघटक पनवेल), सौ.लक्ष्मी पाटील (शहर संघटिका तळोजा) आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रायगड जिल्ह्याचे सल्लागार बबनदादा पाटील यांनी सांगितले की, सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या मराठी भाषेला न्याय देण्यासाठी विशेष लढा आपल्या जबाबदारीतून त्यांनी दिला आहे आणि मराठी भाषेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव संपूर्ण देशात गाजतय आणि त्याच कौतुक दस्तुरखुद्द सुप्रीम कोर्टाने केले आहे. आयोजकांनी यावेळी ज्या समस्या मांडल्या त्या पनवेलच्या जनतेच्या हिताच्या आहेत, आणि या विषयावर आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून सुभाष देसाई यांनाही यामध्ये लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली. तसेच आज महाविकास आघाडी सरकारने येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. नगरविकास मंत्र्यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा मालमत्ता कर घेवू नका असे आदेश दिले. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. लोकांची कामे करणारे शिवसैनिक आम्ही आहोत. पनवेल महानगरपालिकेने उद्यानांवर कोटींच्या घरात टेंडर काढत आहेत. आणि आपल्या ठेकेदारांचे भले करून मनमानी करत आहेत. शिवसेना शाखा उद्घाटन सोहळ्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आज शिवसेनेची शाखा उद्घाटन सुरू झाली नाही तर ते मंदिर आहे. आणि जनतेने या मंदिरात आपल्या अडचणी सांगितल्यानंतर त्या मंदिरातील पुजाऱ्याने त्या अडचणी सोडविण्यासाठीचे हे मंदिर जनतेनेच असणार आहे.
यावेळी बोलताना मावळचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम उल्लेखनीय आहे. पनवेल शहरातील महापालिकेने मालमत्ता कराला जाचक स्वरूप दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेल्या पाठपुरावा आणि परिस्थितीचा आधार घेत पालिका आयुक्तांना चुकीच्या कार्यपद्धतीबाबत सुनावले आहे. यावेळी पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल आणि उप महानगरप्रमुख यतीन देशमुख यांनी शिवसेनेची केलेली बांधणी नक्कीच कौतुकास्पद आहे आणि शिवसेनेत आल्यानंतर त्यांना मिळालेला सन्मानपूर्वक जिव्हाळा हाच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे हे कुटुंब आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना आणि पनवेलमधील आयोजकांनी मांडलेल्या प्रश्नांचे समाधान करताना त्यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री हे अन्याय सहन करणारे मुख्यमंत्री बिलकुल नाहीत, तर त्यांचे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचे कौतुक अनेक ठिकाणांहून करण्यात आले. ही बाब एक महाराष्ट्र वासिय म्हणून आपल्याला अभिमानास्पद आहे. पनवेलमधील पाण्याचा प्रश्न, मालमत्ता कर या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहेच पण त्याहून अधिक प्रयत्नशील हे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राहतात. WHO या संस्थेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सरकारचे विशेष अभिनंदन करून जागतिक पातळीवरील पुरस्कार महाराष्ट्राला देण्यात आला ही विरोधकांना एक चपराक असणार आहे. येणाऱ्या काळात बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आखला जाणार असून त्याच्यासोबत मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना देखील आखली जाणार आहे. रोजगार तर मिळावा पण रोजगार देणारे म्हणून उदयास या असे या योजनेचे द्योतक असणार आहे. येणाऱ्या सर्व काळामध्ये महाराष्ट्र कधी थांबलाच नाही आणि यापुढेही कधीही थांबणार नाही, असेही त्यांनी सांगून आपले प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये रुपेश ठोंबरे (शहर प्रमुख नवीन पनवेल), कु.मंदा जंगले (उपमहानगर संघटिका), सौ.अपूर्वा प्रभू (शहर संघटिका नवीन पनवेल), विश्वनाथ गुरव (शाखा प्रमुख), अजय गोवाजी (उपशहर प्रमुख), अतुल मोकल (उपशहर प्रमुच्य), किरण सोनावणे (विभाग प्रमुख), विपिन झुरे (विभाग प्रमुखा), सचिन बोरवे (शाखा प्रमुख), विनायक कटोरे (शाखा प्रमुख्य), संकेत जाधव (शाखा प्रमुख), अनिकेत पालव (शाखा प्रमुख), रवी पाटील (शाखा प्रमुखा), जितेश खिदळकर (शाखा प्रमुख), स्वप्नील बिरारे (शाखा प्रमुख), तन्मय देशपांडे (शाखा प्रमुख), विशाल गोरड (शाच्या प्रमुख), क्षत्रुज भोजने (शाखा प्रमुख), प्रयाग ताम्हणे (शाखा प्रमुख), विकास पोवळे (शाखा प्रमुख), प्रेम कांबळे (शाच्या प्रमुच्य), कुंडलिक माघाडे (शाखा प्रमुच्या), प्रवीण चोणकर (शाखा प्रमुख), जवेश पाखरे (शाखा प्रमुख), प्रसाद भगत (शाखा प्रमुख), जवेश पाटील (शाखा प्रमुख), अविनाश गव्हाणकर, कु.सुनिल जाधव, जितेंद्र सिद्, कैलाश कांदळकर, कु.सिद्देश गुरव, कु.सत्यवान गायकर आदि जणांचा सहभाग लाभला.