- भाजपप्रणित केंद्र सरकारच्या निषेधार्थ नवी मुंबई राष्ट्रवादी रस्त्यावर
- -बेलगाम कंगना राणावतचा पदमश्री पुरस्कार काढून घ्या !
- इतर राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजप जातीय
दंगली घडवतेय ! जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांचा आरोप !
नवी मुंबई : भारत देशाच्या अस्मितेचा, अभिमानाचा आणि महापुरुषांच्या बलिदानाचा आपल्या वक्त्यातून अपमान करणाऱ्या बेजबाबदार आणि बेलगाम कंगना राणावत सारख्या महिलेला पदमश्री सारखा महान पुरस्कार देण्याची शिफारस केंद्रातील भाजप सरकार देशाच्या राष्ट्रपतींकडे करते, हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि कंगना रानावताचा तीव्र निषेध करीत असून कंगना राणावतला दिलेला पदमश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या निषेध मोर्चात करण्यात आली. सदर मोर्च्याचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अधिक गावडे यांनी केले.
दरम्यान, त्रिपुरा राज्यामध्ये जे घडले त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत, हि अत्यंत चिंतेची बाब आहे. इतर राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजप जातीय दंगली घडवतेय, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात घडलेली दंगल हे भाजपचेच षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी केला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लाखो महापुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तेव्हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र २०१४ रोजी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे बेजबाबदार वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला आहे. असंवैधानिक आणि बेजबाबदारपणे वक्तव्य करून सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या एकात्मतेचा आणि संविधानिक मूल्यांचा अपमान केला आहे. असे बेजबाबदार वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला आहे. याद्वारे तिने तिचा भाजप विचारांचा चेहरा जनतेला दाखविला. तिच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई, अशी जोरदार मागणी नवी मुंबई राष्ट्रवादी महिला मोर्च्याच्या वतीने यावेळी करण्यात आली. यावेळी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक युगपुरुषांच्या बलीदानातून, त्यागातून भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. अशोक चक्रासह देशाचा तिरंगा डौलाने फडकत आहे, यातून देशाची एकतेचे दर्शन होते, हा देशाचा गैरव आहे. महापुरुषांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य भारतात जन्म घेऊ शकलो. मात्र काही मुर्खांना वाटत कि देश २०१४ साली स्वातंत्र्य झाला. २०१४ साली देशात भाजप प्रणित सरकार निवडून आले आहे. केंद्र शासनाने पहिल्यांदा निषेध नोंदवायला हवा होता, मात्र, भाजप सरकारच या मूर्ख बाईच्या पाठीमागे उभे आहे , असे वाटते. विक्रम गोखले सारखे साहित्यिक देखील चुकीच्या विचारांकडे वळले. अशा बाईला पुरस्कार मिळावा, म्हणून भाजप शिफारस करते हे अत्यंत खेदजनक आहे, अशी टीका अशोक गावडे यांनी यावेळी केली. दरम्यान, कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.