पनवेल : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने कोविड काळामध्ये आप आपल्या विभागामध्ये देशासाठी, राज्यासाठी व समाजासाठी एक कर्त्यव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी अहोरात्र केलेल्या कार्याची दखल घेत कळंबोली येथील डॉ. प्रकाश माने, डॉ. रत्नराज चारू पाटील, डॉ सुयोग पाटील, डॉ. अक्षय कोळेकर, डॉ. अनघा दिवे, डॉ. गौरीहार भगवान पाटील (तळोजे), डॉ. प्रमोद दाभाडे, विवेक शिंदे, डॉ. प्राजक्ता बाळासाहेब बोबडे, डॉ.प्रियंका भगत, डॉ. निखिल पाटील, अनिल मेटकरी, अमृत वड्डे, उमेश जाधव, सायली कनवाळु, लोकेश पाटील, इत्यादी कोविड योद्धांचा सन्मान शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहर समन्वयक गिरीष धुमाळ, शहर प्रमुख रुपेश ठोंबरे, शिवसेना उत्तर भारतीय सेल चे सी.पि. प्रजापती, गिरीष गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, विभाग प्रमुख आकाश शेलार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली सन्मान कोविड योद्धांचा !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक ! वनक्षेत्रात आग लावणे किंवा वणवे लावण्याला पूर्णपणे आळा घालणार; कठोर उपाययोजना करणार – वने मंत्री गणेश नाईक !
- मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करा!जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
- वलप ग्रामपंचायतीतील २६६० बनावट जन्मनोंदी प्रकरणी ३ आरोपी अटकेत – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती
- मोदींच्या १२ वर्षांत भारताचा सर्वांगीण विकास; पंतप्रधान मोदी देशासाठी वरदान – आमदार संजय केळकर
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »








