पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर काल आयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला. या पावन उत्सवानिमित्त देशभरात नमो नमो मोर्चा भारत या राष्ट्रप्रथम विचाराने प्रेरित सामाजिक संघठना मार्फत महिला शक्तीला प्रोत्साहन देणे व नारीशक्ती सन्माना करिता राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे आयोजन हे नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोपान उंडे पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय संयोजक सत्यप्रकाश सिंह व राष्ट्रीय संघटन मंत्री विजयजी हटवार व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आर के दिवाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
देशभरातून नमो नमो मोर्चा भारतच्या महिला, युवती व पुरुष पदाधिकाऱ्यांनी घर-अंगण, मंदिर परिसरामध्ये सजावट, रोषणाई, रांगोळी, भगवे झेंडे व पताका लावून नागरिकांना मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
देशभरातून नारी सक्ती सन्माना करिता आयोजित राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेत महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम, तेलंगणा, कर्नाटक राज्यांमधील शेकडो युवती महिलांनी या राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेत सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेसाठी युवती व महिलांनी रांगोळी काढून विविध पारंपारिक वेशभूषेत परिसरात व घरात दिवे लावून मिठाई भरवून मोठ्या आनंदात दीपोत्सव साजरा केला.
सदर दीपोत्सवाचे फोटो नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजन समितीला पाठवण्यात आले असून १५ ऑगस्टला प्रत्येक राज्यातून ३ व त्यामधून राष्ट्रीय पातळीवरील अंतिम ३ विजेते घोषित करण्यात येतील. देशभरातून जवळपास ७०० च्या वर युवती व महिलांचे फोटो स्पर्धेसाठी आले असून प्रथम ३ विजेत्यांना महाराष्ट्राची स्पेशल ९ वारी पैठणी साडी सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल असे नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
कोकण दर्पण.