Press "Enter" to skip to content

शिवसेना पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करणार – योगेश तांडेल !

पनवेल : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्री पद मिळाले आणि राज्यातील शिवसेनेच्या कमजोर विभागात शिवसेना मजबुतीकरण सुरू झाले. तसेच मुंबई महानगर पालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेचा झेंडा फडकत राहिला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेना बळकट करण्याकडे शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. नुकतेच पनवेल तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झालेल्या योगेश तांडेल यांनी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांची भेट घेवून पक्षवाढीसाठी पुढील रणनीती काय असणार आहे ? याबाबत चर्चा केली.

गेली अनेक वर्षे भाजपसोबत एक कार्यकर्ता म्हणून योगेश तांडेल यांनी काम पाहिले आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली योगेश तांडेल यांनी शिवबंधन आपल्या मनगटावर बांधले. तदनंतर काही दिवसातच त्यांच्यावर शिवसेनेच्या पनवेल तालुका संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी या पदाला आपण योग्य न्याय मिळवून देणार असून पनवेल तालुक्यात शिवसेना पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे योगेश तांडेल यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची त्यांनी सहकाऱ्यांसमवेत भेट घेवून चर्चा केली. त्यांच्यासोबत यावेळी खारघर उपशहरप्रमुख नंदु वारुंगसे, शाखाप्रमुख वैभव दळवी, शाखाप्रमुख पांडुरंग घुले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी किशोरी ताईंनी पक्ष संघटने विषयी मोलाचे मार्गदर्शन करून योगेश तांडेल आणि सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »