नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्या वतीने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत तुर्भे स्टोअर येथील शिवसेना शाखा कार्यालयात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आहे आहे. रक्त संकलनासाठी नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलच्या ब्लड बँकेला पाचारण करण्यात आले आहे.
सध्यस्थीतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून कोरोनाच्या काळातील सामाजिक गरज लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती जेष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली.
नवी मुंबई आणि तुर्भे परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोना संकटात आपले सामाजिक दायित्व दाखवावे, असे आवाहन सुरेश कुलकर्णी यांनी केले आहे.
कोकण दर्पण.