पनवेल:- संत सावता माळी हॉल येथे माता रमाई महिला मंडळ तक्का,पनवेल यांच्या आयोजनात राजमाता जिजाऊ,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या संयुक्त जयंती महोत्सव पनवेल तक्का येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संयुक्तं जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. प्रमुख वक्ता संगीता थोरात यांच्या उल्लेखनीय प्रबोधन शैलीतून महिला प्रभावित झाल्या,सदर कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला तसेच उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करीत ह्या महामातांना अभिवादन केले,कार्यक्रमात लहान मोठ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला होण्यात मदत केली.मग ते मनोगत असो ,गाणे असो की एकपात्री नाटक,नृत्य असो. सर्वांचा सहभाग होता,या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण माता रमाई महिला मंडळातील सदस्यांनी केले होते,त्यात सुचित्रा बोराडे,शोभा गरबडे,शोभा गवळे,रंजना सुर्यगंध,उषा मेश्राम,चित्रा दहीवले,रुपाली कांबळे,निशा कांबळे,शुभांगी कांबळे,मंदाकिनी शेळके,जया अवसरमोल ,स्वरा जाधव,वैशाली गायकवाड,उषा कांबळे, छाया पाटील,मंदा कातूरे,मनीषा कांबळे,सुरेखा बोराडे,सुरेखा पवार,संध्या तांबे , कौसर सावंत आणि सुनिता खिल्लारे यांचा समावेश आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळ तक्का पनवेल,यांचे पदाधिकारी,आयु,बबन दादा कांबळे ,संजय बोराडे, राधेश्याम खिल्लारे,मिलिंद कांबळे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाली.तसेच प्रमोद दहीवले ,विश्वनाथ गायकवाड,राजकुमार मेश्राम ,सुनील वाघपंजे आणि शेळके भाऊ हे सुद्धा उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात हॉल च्या कर्मचारी यांनीही सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे व उपस्थीत सर्वांचे आभार मानण्यात आले,चांगले सामाजिक उपक्रम यापुढेही करत राहू असे माता रमाई महिला मंडळाचे धोरण असल्याचे मत सदस्य महिलांनी व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ,माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संयुक्त जयंती उत्सव तक्का येथे संपन्न.
More from RaigadMore posts in Raigad »
Be First to Comment