चिपळूण-कळवंडे धरणाच्या कामात भ्रष्टाचार ?
पाटबंधारे अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करा : काँग्रेसची मागणी !
चिपळूण , प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या कळवंडे गाव धरणाच्या कामात भ्रष्टाचार भ्रष्टाचार झाला असून येथील पाटबंधारे विभागातील अधिकारी व ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी काँगेसच्या वतीने करण्यात आली आहे
चिपळूण-कळवंडे धारण हे १९८१ साली बांधण्यात आले आह। सध्यस्थितीत धरणाच्या डागडुजीचे कामासाठी ८५ लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे मात्र, सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कामाच्या ठिकाणी ठेकेदार अथवा अधिकारी दिसत नाही धरणाच्या ठिकाणची परिस्थिती धोकादायकजन्य असल्याचे काँग्रेसचे नेते सुनील सावर्डेकर यांनी सांगितले
दरम्यान, सुनील भाऊ सावर्डेकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती कमिटी अल्पेश मोरे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस सूर्यकांत चिपळूणकर चिपळूण तालुका अनुसूचित जाती कमिटी केतन पेवेकर सरचिटणीस रत्नागिरी जिल्हा अनुसूचित जाती कमिटी संभाजी चिपळूणकर मधुकर सावर्डेकर रवी पालशेतकर चंद्रकांत पेवेकर अरविंद खेरटकर अनिरुद्ध चव्हाण कार्यकर्ते काँग्रेसच्या वतीने आज कळवंडे गाव येथील धरणाचे पाहणीदौरा करण्यात आला जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस जलसंपदा अभियंता रत्नागिरी यांना मागणी पत्र देण्यात येणार आहे
कोकण दर्पण
Be First to Comment