पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : महाराष्ट्र पोलीस भरतीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेबाबत भारत रक्षा मंचने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारची भूमिका समाजात विभाजन करणारी असून राज्यपालांनी सदर प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी भारत रक्षा मंचच्या वतीने यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्रातील पोलीस भरतीत अल्पसंख्याक समाजाला सरकारच्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाईल असे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले असून सरकारने देखील त्याला दुजोरा दिला आहे. यामुळे अल्पसंख्यांक आणि बहुजन समाज यांच्यात विभाजन आणि भेदभाव केल्याची भूमिका दिसते. सदर बाब सामाजिक एकात्मतेमध्ये फूट पाडण्याची असल्याचे मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा बिना गोगारी यांनी राज्यपालांकडे नमूद केले.
कोकण दर्पण