पनवेल : भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित होऊन कर्जत तालुक्यामधील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
खांदा कॉलनीत झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कर्जत तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, सहकार सेलचे तालुकाध्यक्ष प्रकाश पेमारे, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन म्हस्कर, सरचिटणीस राजेश भगत, युवा नेते किरण ठाकरे, राहुल बदे आदी उपस्थित होते.
या वेळी भाजप कर्जत तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर, कळंब विभाग अध्यक्ष संदीप पालांडे व पोशीर पं. स. विभाग अध्यक्ष सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील संभाजी वेहेले, दशरथ वेहेले, निलेश ऐनकर, नरेश धुळे, जगदिश धुळे, किरण नाईक, रोशन पाटील, समीर निचिंधे, सतीश जोशी, गणेश विषे, सतिश दिघे, हेमंत निचिंधे, राम जोशी, सुनील दळवी, अविनाश दळवी, श्याम जोशी, निखिल ऐनकर, केतन ऐनकर, सागर दळवी, नंदू दळवी, राजेश जोशी या शिवसेना व शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी पक्षात स्वागत केले.
कर्जतमधील शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »