Press "Enter" to skip to content

बेजबाबदार कंगना रणावतच्या निषेधार्थ नवी मुंबई राष्ट्रवादीचे १६ नोव्हेंबर रोजी वाशी येथे आंदोलन !

नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लाखो महापुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, तेव्हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र २०१४ रोजी देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे बेजबाबदार वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला आहे. असंवैधानिक आणि बेजबाबदारपणे वक्तव्य करून सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या एकात्मतेचा आणि संविधानिक मूल्यांचा अपमान केला आहे. असे बेजबाबदार वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान केला आहे. याद्वारे तिने तिचा भाजप विचारांचा चेहरा जनतेला दाखविला.
तिच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अशोक अंकुशराव गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »