पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर आयोजित आधार कार्ड शिबिराचा कामोठे शहरातील शेकडो नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
कामोठे येथील डी जी गोवारी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इमारतीत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदासदादा गोवारी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर, राष्ट्रवादी पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष बबनराव पवार, उपाध्यक्ष उत्तमराव गायकवाड, उपाध्यक्ष अजिनाथ सावंत, पनवेल शहर जिल्हा विधी सेल अध्यक्ष पवनकुमार गायकवाड, कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले, पनवेल शहरजिल्हा महिला अध्यक्षा नेहा पाटील तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर कार्याध्यक्ष किशोर मुंडे, कामोठे शहर उपाध्यक्ष अनंत वारे, पदवीधर सेल पनवेल अध्यक्ष स्वप्नील काटकर, कामोठे पदवीधरचे अध्यक्ष समिध फदाले, पनवेल जिल्हा सरचिटणीस नागेश पवार, कामोठे शहर उपाध्यक्ष महेंद्र पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली. डी जी गोवारी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित आधार कार्ड शिबिराचा शेकडो नागरिक व विद्यार्थ्यांनी घेतला लाभ !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »