Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म – केंद्रीय मंत्री कपिल पाटील !

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म – केंद्रीय मंत्री कपिल पाटील 
लोकांच्या अंधारलेल्या वाटा प्रकाशमय करण्याचे काम – आमदार गणेश नाईक 


पनवेल (प्रतिनिधी)  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म आहे, त्यामुळेच ते समाजोपयोगी उपक्रमे राबवून जनसेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज (दि. ०८) खांदा कॉलनी येथे काढले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा निमित्ताने खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार वाटप महाशिबीर यशस्वीपणे पार पडले. या १५ व्या या महाशिबिराचे उदघाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री  कपिल पाटील यांच्या हस्ते आणि  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.         केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, आम्ही महाविद्यालयात असल्यापासून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव सतत ऐकत असायचो. माणसाकडे कितीही पैसा असू दे भूक लागली म्हणून भाकरी ऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही त्यामुळे ठराविक रेषेपर्यंत पैशाला महत्व आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा प्रामाणिकपणे आयुष्यभर लोकं जोडण्याचे आणि लोकांची सेवा करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करत असतात म्हणूनच त्यांच्या नावाला शेठ हे नाव आदराने जोडले गेले आहे.  जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने समाजाची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर आहेत.

मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सेवाही समर्पण धोरणाप्रमाणे रामशेठ ठाकूर आणि त्यांची दोन्ही मुले काम करत आहेत. रामायणाने कसं जगावे शिकवले, महाभारताने कसं जगू नये शिकवले आणि समाजाला सोबत घेऊन लोकांची सेवा करण्यासाठी कसं जगावे हे भगवतगीताने शिकवले आहे. आणि कदाचित रामशेठ ठाकूर यांनी भगवतगीता वाचली असेल म्हणूनच ते अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रमे राबवत असतात. जीवनाला पूर्णत्वास नेण्यासाठी दोन पैलू आहेत. आपण परमेश्वराचे रूप आहोत आणि जगात सर्वत्र परमेश्वर आहे हि भावना ठेवून जगात जनार्दन शोधण्याचे काम करतो तोच अशाप्रकारचे उपक्रम राबवू शकतो. म्हणून सामाजिक संवेदनाने जो काम करतो तो उपचाराने बरा झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरच्या आनंदाने आनंदीत होतो आणि हा आनंद सामाजिक सेवेच्या माध्यमातून रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी मिळवत आहेत. समाज सर्वांग सुंदर आणि उन्नत बनवायचा असेल तर जी कर्तव्य आपल्याला पार पाडायची आहेत ती पार पाडताना धर्माचे आचरण आपण करतो म्हणून सेवेचा धर्म आत्मसात करतो तो खरा धर्म आहे. रस्ता सुंदर असेल तर रस्ता कुठे जातो विचारले पाहिजे पण धेय्य जर सुंदर असेल तर रस्ता कुठे जातो विचारायची गरज नसते लोकं आपोआप तुमच्या पाठी चालायला लागतात आणि त्या अनुषंगाने रायगडमध्ये ध्येय्य चांगले ठेवून रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली संस्था काम करीत आहे. त्यामुळे समस्त समाज रामशेठ ठाकूर यांच्या पाठीशी राहून त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करीत आहे आणि हि उल्लेखनीय बाब असल्याचे नामदार कपिल पाटील यांनी अधोरेखित केले.        त्यांनी पुढे सांगितले कि, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणली. या माध्यमातून १३०० आजारांवर पाच लाख रुपयांपर्यंत उपचार करण्याची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी केली. हि योजना अमेरिकेने राबवली मात्र ते यशस्वी झाले नाहीत. भारतात मोदीजींनी हि योजना राबवली आतापर्यंत २५ कोटी कार्डाचे वाटप करत यशस्वी केली. जगावर कोरोनाचे संकट आले आणि या संकटात भारत नष्ट होईल कि काय अशी चिंता सर्व प्रगत देशांनी केली. कारण परदेशात तयार झालेली लस भारतात यायला १० वर्षे लागायचे. परंतु तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि आपल्या देशातील शास्त्रज्ञांच्या क्षमतेवर जगात सर्वात प्रथम लस बनवण्याचे काम आपल्या देशाने केले.  भारतात २०० कोटी डोस देण्याचे काम आपल्या सरकारने केले. त्याचबरोबरीने जगाच्या पाठीवर १२० देशामध्ये आपण लसीचा पुरवठा केला. आणि त्या लोकांचेही प्राण वाचविण्याचे काम माणुसकीच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  असे सांगतानाच केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामध्ये अडीच लाख वेलनेस सेंटरची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबरीने शहराप्रमाणे देशातील प्रत्येक गाव सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील असून  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील गाव घडविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचेही नामदार कपिल पाटील यांनी सांगितले.           यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, रामशेठ ठाकूर मुळातच गुरुवर्य असल्याकारणाने दया, क्षमा, शांती या गोष्टीची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. समाजकार्य, राजकारण क्षेत्रात त्यांनी प्राविण्य मिळविले. स्वतःचे जीवन घडवताना समाजाच्या अडीअडचणी ओळखून समाजातील रंजल्या गांजलेल्या घटकांना सर्व स्तरावर मदतीचा हात देण्याचे काम रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून झाले. आरोग्यसेवेच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यामध्ये भूतकाळात एवढा मोठा महाशिबीर झाला नाही. आणि हे करताना विनम्रता आहे. रामशेठ ठाकूर यांच्या कुटुंबात जन्म घेतलेले आमदार प्रशांत ठाकूर अतिशय संयमी, विवेकी, सर्व गुण  संपन्न असून जीवन कृतार्थ करण्याच्या अनुषंगाने पाऊल टाकणारी हि पिढी आहे. प्रत्येक जण आपला संसार चांगला व्हावा मुले सुशिक्षित व्हावीत यासाठी प्रयत्नशील असतो मात्र रामशेठ ठाकूर यांनी लोकांच्या अंधारलेल्या वाटांना सेवेरुपणे प्रकाशमय करण्यासाठी प्रशांत आणि परेशलाही वारसा दिला आहे. आणि दुसऱ्याचे दुःख हलके करण्यासाठी अविरतपणे काम सुरु आहे.          लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले कि, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची १९९६ साली स्थापना झाली तेव्हापासून आज पर्यंत अखंडपणे समाजसेवेचे व्रत सुरु आहे. आणि त्या माध्यमातून वर्षभर आपण समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. लोकांच्यात सतत राहणे आणि त्याची सेवा करणे आपला धर्म आहे. त्या अनुषंगाने वाटचाल करताना कार्यकर्ते हितचिंतकांची मोलाची साथ मिळत असते म्हणून आपण हि समाजसेवेची उपक्रमे यशस्वी करत असतो, असेही त्यांनी अधोरेखित केले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत देशाला आणि राज्याला विकसित करण्याची व गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम करत आहेत आणि हि काम करण्याची पद्धत अंगिकारली आहे. नामदार कपिल पाटील हे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मात्र मेहनतीने पुढे आलेले नेतृत्व आहे. देशाच्या प्रगतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचे नाव देण्यासाठी त्यांचा पुढाकार महत्वाचा आहे असे सांगतानाच थोड्या दिवसातच दिबासाहेबांचे नाव विमानतळाला मिळेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, हे महाशिबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आले आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून ज्या दिवशी सत्ता घेतली त्या दिवसापासून देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून त्यांनी योजना अंमलात आणल्या. आणि त्यानुसार देशाच्या प्रगतीला चालना मिळाली. देशाचा विकास आणि आरोग्य व्यवस्था याच्यावर त्यांनी विशेष भर दिला. पीपीई किट, मास्क आपल्या देशात तयार होत नव्हते. त्याची निर्मिती झाली त्याचबरोबर जगावर आलेल्या कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी लस ची निंर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाली. आपल्या देशाला या महाभयंकर रोगापासून वाचविण्याबरोबर इतर देशांनाही संकटातून वाचविण्याचे काम झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगानेही मान्य केले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या उपयोगाचे कार्यक्रम सतत राबविले जात असल्याचे सांगून यासाठी आपणा सर्वांची मदत मोलाची असते, असेही त्यांनी म्हंटले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांनी केले. त्यांनी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महाशिबिरासंदर्भात माहिती देताना आढावा मांडला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.  या अंतर्गत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले असून या महाशिबिराचा संपूर्ण खर्च श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने केल्याचे त्यांनी सांगितले.         यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आगरी समाजाचे भिवंडी अध्यक्ष अरुण पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष कविता चौतमोल, माजी उप महापौर सीता पाटील, पनवेल मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अमोघ ठाकूर, कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश गायकर,  व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील,  आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या महाशिबिरास स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. 
        या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग,  दंतरोग, हाडांचे रोग, ईसीजी, मधुमेह, नाक-कान-घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफत करण्यात आले.  त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी व चष्मे वाटप, तसेच अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.  यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड, तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबरीने अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती.  उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा ११ हजार ३५२ नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.  महाशिबिर यशस्वी करण्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन, तसेच जे. जे. हॉस्पिटल मुंबई, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल, एमजीएम हॉस्पिटल कामोठे व कळंबोली, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळ, भारती विद्यापीठ खारघर, मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर, तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हिट सेंटर पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल, सत्य साई संजिवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचे एकूण ५३६ वैद्यकीय तज्ञ् व त्यांचे सहकारी, महाशिबीर यशस्वी करण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या ३५ कमिट्यांचे पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, स्वयंसेवकांचे योगदान लाभले. 

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »

18 Comments

  1. zoritoler imol December 25, 2024

    so much superb information on here, : D.

  2. drover sointeru December 30, 2024

    My spouse and I stumbled over here coming from a different web page and thought I may as well check things out. I like what I see so now i am following you. Look forward to looking at your web page yet again.

  3. Hello there, I found your blog by the use of Google even as searching for a similar matter, your website got here up, it appears to be like great. I have bookmarked it in my google bookmarks.

  4. situs idagent138 slot gacor January 22, 2025

    I am really enjoying the theme/design of your website. Do you ever run into any browser compatibility issues? A small number of my blog readers have complained about my site not operating correctly in Explorer but looks great in Safari. Do you have any recommendations to help fix this issue?

  5. luckygaming138 slot online January 22, 2025

    I don’t even know how I stopped up right here, however I believed this submit was once great. I do not understand who you’re however definitely you’re going to a famous blogger should you are not already 😉 Cheers!

  6. kiss69 slot maxwin January 22, 2025

    Thank you for sharing superb informations. Your website is so cool. I am impressed by the details that you have on this blog. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this web page, will come back for more articles. You, my friend, ROCK! I found just the info I already searched everywhere and simply couldn’t come across. What a perfect web site.

  7. I truly appreciate this post. I have been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You have made my day! Thanks again

  8. Pretty section of content. I just stumbled upon your website and in accession capital to assert that I acquire in fact enjoyed account your blog posts. Any way I will be subscribing to your augment and even I achievement you access consistently quickly.

  9. tlovertonet January 23, 2025

    I like this blog very much, Its a very nice berth to read and obtain info . “Perpetual optimism is a force multiplier.” by Colin Powell.

  10. It’s a shame you don’t have a donate button! I’d without a doubt donate to this excellent blog! I suppose for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to my Google account. I look forward to fresh updates and will talk about this blog with my Facebook group. Talk soon!

  11. I’ve been browsing online more than three hours today, yet I never found any interesting article like yours. It’s pretty worth enough for me. Personally, if all site owners and bloggers made good content as you did, the internet will be a lot more useful than ever before.

  12. Very interesting information!Perfect just what I was searching for! “One man’s folly is another man’s wife.” by Helen Rowland.

  13. demo summer138 slot maxwin January 23, 2025

    I have read several just right stuff here. Certainly price bookmarking for revisiting. I surprise how much effort you put to make this sort of magnificent informative website.

  14. daftar kantorbola February 2, 2025

    Kantorbola merupakan pilihan terbaik bagi para penggemar slot online di Indonesia. Dengan berbagai permainan menarik, bonus melimpah, keamanan terjamin, dan layanan pelanggan yang unggul.

  15. GullyBET India February 7, 2025

    Hey very cool site!! Man .. Excellent .. Amazing .. I will bookmark your blog and take the feeds also…I am happy to find so many useful information here in the post, we need develop more strategies in this regard, thanks for sharing. . . . . .

  16. raja slot February 8, 2025

    I love meeting useful information , this post has got me even more info! .

Leave a Reply

Your email address will not be published.