ठाणे : नाट्यकला संगीत क्षेत्रात आयुष्याची अनेक वर्षे देणारे नाट्यकर्मी विजय चावरे यांना ‘गंधार’ या संस्थेच्या गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झालेल्या गौरव पुरस्कार सोहळ्यात विजय चावरे यांना सन्मानित करण्यात आले. नाट्य कला आणि संगीत क्षेत्रातील कार्यक्रमांचे आयोजन आणि संयोजनात मागील ५० वर्षांपासून ते कार्यरत आहेत.
गौरव सोहळा प्रसंगी नरेंद्र बापट, महेश केळुस्कर, आमदार संजय केळकर, श्री, बापट, प्रदीप धवल, श्री काळे आदी मान्यवर उपस्थित होते. गंधार ग्रुपचे मंदार तील्लूर आणि बाळकृष्ण ओडेकर यांनी सदर सोहळ्याचे आयोजन केले होते.