Press "Enter" to skip to content

कार्यतत्पर नगरसेविका : हर्षदा अमर उपाध्याय !

//-संजना महाडिक-//
आपल्या प्रभागातील जनतेसाठी कधीही धावत जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणाऱ्या पनवेल महानगरपालिकेतील खारघर प्रभाग क्रमांक ५ मधील धडाडीच्या नगरसेविका म्हणजे हर्षदा अमर उपाध्याय होय. एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून हर्षदा उपाध्याय यांनी समाजमनात आपली ओळख निर्माण केली आहे.

रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक महानगरपालिका म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका होण्याचा मान हर्षदा उपाध्याय यांना मिळाला. खरंतर खारघर शहराच्या विकासासाठी, येथील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीपासून नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि युवानेते अमर उपाध्याय यांनी आपले योगदान दिले आहे. महापालिकेच्या स्थापनेपुर्वी खारघर सिडको नोडमधील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झालेल्या आंदोलनात हर्षदा उपाध्याय आणि अमर उपाध्यय यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यांच्या कामाची पोच पावती म्हणूनच खारघर प्रभाग ५ मधील जनतेनी आपला लोकप्रतिनिधी म्हणून हर्षदा उपाध्याय यांना पनवेल महापालिकेच्या सभागृहात पाठवले.
तेव्हापासून प्रभागातील अनेक विकासकामांना मार्गी लावले आहे. रस्ते, दिवाबत्ती, पदपथ, उद्यान, उद्यानातील ओपन जिम अशा अनेक विकास कामना पूर्णत्वास नेले. खारघरवासीयांच्या पाणी प्रश्नावर सिडको प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरण्यात नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि युवानेते अमर उपाध्याय यांनी प्रखर भूमिका मांडली आहे.
खारघर मधील वाहतुकीचा प्रश्न तसेच अन्य नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पनवेल मनपा आणि सिडको प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो.
नागरी विकासाच्या कामांबरोबर सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रम राबविण्यावर विशेष भर दिला आहे. महिला आणि विध्यार्थांच्या गुणांना, कलेला चालना देणारे विविध उवक्रम, फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले.
माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि महापौर डॉ कविता चौतमल व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या सहकार्याने माझ्या प्रभागात विकास कामांना गती मिळत आहे. युवानेते तथा भाजप युवा मोर्च्याचे खारघर तळोजा मंडल सरचिटणीस अमर उपाध्याय यांच्या भरीव योगदान आणि खंबीर पाठिंब्यामुळेच मी जनसेवा करू शकत आहे, अशी भावना नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली.

कोकण दर्पण.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »