Press "Enter" to skip to content

शुश्रूषा हॉस्पिटल रायगड आणि कोकणसासाठी आरोग्याची मोठी उपलब्धी ठरेल : जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. आर. काणे यांचे प्रतिपादन !

  • पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न !

पनवेल : डॉ. संजय तारळेकर म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला मिळालेला खरा समाजकर्मी आहे. त्यांचा मागील ३० वर्षांहून अधिक काळाचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि हॉस्पिटलमधील आधुनिक वैद्यकीय सेवेमुळे पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल, उरण , रायगडसह संपूर्ण कोकणवासीयांच्या आरोग्यसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे, असे प्रतिपादन जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जी. आर. काणे यांनी पनवेल येथे केले.
जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजय तारळेकर आणि डॉ अनिता तारळेकर यांच्या पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन शनिवारी डॉ जी. आर काणे, डॉ. अजय महाजन, डॉ. अजय चौरसिया, डॉ. उदय जाधव, डॉ. मॅथ्यू थॉमस, विजय लोखंडे, शिरीष राजे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
मागील ३० वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ संजय तारळेकर यांनी नवी मुंबई आणि कर्जत नंतर पनवेल येथे भव्य असे शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले आहे. नेरुळ , नवी मुंबई येथे शुश्रूषा हार्टकेयर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मागील २० वर्ष वैद्यकीय सेवा देत आहेत. पहिली हृदय शस्त्रक्रिया करणारे शुश्रूषा हॉस्पिटल हे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पहिले हॉस्पिटल आहे. नेरुळ येथील हॉस्पिलटलमध्ये हृद्यरोगासह इतर अनेक रोगांवर उपचार मिळत असल्याने नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी मोठी उपलब्धी झाली होती. डॉ. संजय तारळेकर इथेच थांबले नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे ध्येय मोठे आहे. शुश्रूषा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या माध्यमातून डॉ संजय तारळेकर आणि डॉ. अनिता तारळेकर यांनी नाशिक येथे हॉस्पिटल सुरु केले. तदनंतर कर्जत येथे हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा सुरु केली. पनवेल महानगरात आपण अत्याधुनिक यंत्र सामुग्री असलेले सुसज्ज हॉस्पिटल सुरु करावे, अशी प्रचंड इच्छा डॉ संजय तारळेकर यांची होती. डॉ संजय तारळेकर यांचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. डॉ संजय तारळेकर यांचे स्वप्न म्हणजे पनवेल, उरण, रायगडसह संपूर्ण कोकणाला उत्तमोत्तम वैद्यकीय सुविधा देणे आहे. पनवेल येथे सुरु झालेल्या शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून आज ते सत्यात उतरले आहे.
पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ईसीजी, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी, इको, मेजर ऑपरेशन थिएटर, युरिलॉजि आणि नेप्रोलॉजि डिपार्टमेंट, लॅब, डायलेसिस युनिट, ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट, बर्न युनिट अँड प्लास्टिक सर्जरी, इंटरवस्क्युलर लेसर थेरेपी, रेस्पाराटोरी लॅब, गायनॉकॉलॉजि आणि पेडिऍट्रिक, इकमो युनिट, लॅबोरेटरी सर्विसेस डाईग्नोस्टिक रेडिओलॉजि आदी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये लवकरच ब्लड बँक सुरु करण्यात येणार आहे. त्याच बरोबर प्रेव्हेंटिव्ह हेल्थ चेक अप्स, ब्रेस्ट क्लिनिक, पेन मॅनॅजमेन्ट क्लिनिक, डायबेटिस क्लिनिक, डायलिसिस युनिट आदी सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर रुग्णालयात कॅशलेस फॅसिलिट्स उपलब्ध आहे.

संजय महाडिक

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »