Press "Enter" to skip to content

नवनिर्वाचित रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी नानाभाऊ पटोले यांची भेट !

पनवेल : रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदी कामगारनेते महेंद्र घरत यांची निवड झाल्या बद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी नाना पटोले यांनी नवनियुक्त रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण जिल्हा पिंजून काढून जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसाठी सर्व सेलच्या अध्यक्षाना सोबत घेऊन जिल्हा दौरा करण्याच्या सुचना दिल्या आहेत.व आजपासूनच जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण कामाला लागावे. अश्या प्रकारच्या सुचना नाना पटोले साहेबांनी नवनियुक्त अध्यक्ष महेंद्र घरत यांना दिल्या. यावेळी रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धा ठाकूर,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कटेकर, खालापूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना म्हात्रे,अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर, श्रीवर्धन तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आझाद भाई, उरण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेखाताई घरत, अलिबाग महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुजाता पाटील, निर्मला पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, कृष्णा पारंगे, कोकण विभाग मच्छिमार सेलचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, अखलाक शिलोत्री,उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, महाराष्ट्र राज्य संयोजक अ. नु विभाग प्रविण कांबळे, महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलचे सरचिटणीस उमेश भोईर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव निखिल डवले, रायगड जिल्हा एनएसयुइचे अध्यक्ष कुणाल जाधव, मुरलीधर ठाकूर,अंगद ठाकूर, योगेश रसाळ,आनंद ठाकूर,विवेक म्हात्रे, आदित्य घरत, वैभव घरत.इत्यादी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »