- नांदेड : वर्तमान पत्रकारितेचे स्वरुप पाहता या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नवीन पिढीला विवेकपूर्ण आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणे गरजेचे झाले आहे. पत्रकारिता क्षेत्रात पीएच. डी. प्राप्त करणारे डॉ. विकास कदम यांनी नेहमीच वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारिता केली आहे, असे प्रतिपादन भारतीय चित्रपट आणि टेलीविजन संस्था, पुणे (एफटीआयआय) येथील संचालक श्री भूपेंद्र कैंथोला यांनी नुकतेच डॉ. विकास कदम यांच्या सत्कार कार्यक्रमात केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विकास कदम मित्रमंडळा तर्फे रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी नागोराव नरवाडे मंगलकार्यालय येथे विकास कदम यांना पीएच. डी. जाहिरात झाल्यानंतर विशेष सत्कारासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात मराठी भाषा व वांग्मय विषयाचे तज्ञ व प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील माजी मराठी विभागाचे प्रमुख डॉ. जीवन पिंपळवाडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी अंतर्राष्ट्रीय विश्वविद्यापीठातील असोसिएट प्राध्यापक डॉ. राकेश कुमार मिश्र, सहायक प्राध्यापक डॉ। संदीप सपकाले (वर्धा), सहायक प्राध्यापक डॉ. शैलेश कदम (वर्धा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
आपल्या भाषणात भूपेंद्र कैंथोला पुढे म्हणाले, आजच्या युगात शोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. अशावेळी वास्तवादी बातम्यांचे लिखाण अपेक्षित आहे. पत्रकारिता करतेवेळी आपल्या स्वतःचे मत बातमी मध्ये जोडण्याचे टाळल्यास बातमीची विश्वसनीयता अबाधित राहते. डॉ.विकास कदम हे माझ्या मार्गदर्शनात दूरदर्शनसाठी तीन वर्षें कार्यरत होते. तेव्हा त्यांच्यावतीने संतुलित व वस्तुनिष्ठ अशी पत्रकारिता होताना मी अनुभवलेले आहे. नांदेड मध्ये श्री गुरु गोबिंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयाच्या माध्यमातून ते उत्कृष्ठ पत्रकार घडवतील, यात शंका नाही असेही ते म्हणाले. पीएच. डी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी आणखीन जोमाने कार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राकेश मिश्र, डॉ. संदीप सपकाले, डॉ. शैलेश कदम यांनी कार्यक्रमात आपले मत मांडले.
आपल्या सत्कारास उत्तर देतांना डॉ. विकास कदम यांनी सर्वांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, माझ्या घरची परिस्थिती अभ्यासाचे ओझे सहन करण्यासारखी नव्हती. पण कविगुण अंगात असल्याने शिक्षणाकडे लक्ष दिले. मला पत्रकारिता क्षेत्रात व दूरचित्रवाणी माध्यमांत काम करण्याची संधी मिळाली. मुंबई दूरदर्शन येथे काम करत असताना श्री भूपेंद्र कैंथोला सरांचे मार्गदर्शन आणि सहवास लाभला. पुढे आज तक सारख्या माध्यमात येईल काम करण्याची संधी मिळाली.नांदेड रेडिओ वर कार्य केले. आणि पुढे परिश्रमाने सर्वकाही साध्य होत गेले. आज पीएच. डी. सारखा सम्मान माझ्या हाती आल्यावर माझे मार्गदर्शक डॉ. सुधीर इंगळे सर, परभणी तसेच सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानत आहे.
डॉ. जीवन पिंपळवाडकर यांनी अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. विकास कदम यांच्या विद्यार्थीदशे पासूनच्या प्रवासाची आठवण करून दिली. प्रतिकूल परिस्थिती असतांना देखील महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात त्यांचा सकारात्मक सहभाग असायचा. माझा विद्यार्थी आज असंख्य विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आहे, हे पाहून खूप आनंद होत आहे, असेही ते म्हणाले.
श्री भूपेंद्र कैंथोला यांच्या हस्ते डॉ. विकास कदम यांचा यथोचित सत्कार पार पडला. विकास कदम मित्रमंडळाचे प्रमुख एड. साहेबराव शेळके, शंकर नरवाडे, आनंद भोरगे, माया भद्रे, डॉ. भारत कचरे, दीपक नरवाडे, डॉ. अनिल गच्चे, अशोक एडके व सदस्यांनी सम्मान चिन्ह, शाल, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ राजेंद्र गोणारकर यांनी केले तर सूत्रसंचालन स. रवींद्रसिंघ मोदी यांनी केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विकास कदम यांच्या स्नेहीजनांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिति होती.
विकास कदम यांनी वस्तुनिष्ठ पत्रकारिता केली : भुपेंद्र कैथोला यांचे प्रतिपादन !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »