प्रतिनिधी, कोकण दर्पण वृत्तसेवा : आंदोलनानंतर धनगर समाजातील आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाविकास आघाडीपूर्वी राज्यात भाजपची सत्ता होती. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने दिले आणि धनगर समाजाची मते आपल्याकडे वळवून २०१४ मध्ये भाजप सत्तेत आले. मात्र, सत्तेत येऊन देखील भाजपने आपले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने करण्यात आली. आंदोलने करून आरक्षण तर मिळाले नाही, तर धनगर समाजातील आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायहक्कासाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबून टाकणे हा सामाजिक अन्याय आहे, त्यामुळे धनगर आरक्षणातील आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , अशी मागणी मल्लिकार्जुन पुजारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
कोकण दर्पण.