- पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड लसीकरणाचे आयोजन
- नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे : समीर कदम यांचे आवाहन
पनवेल : खारघर वास्तुविहार के एच २ सोसायटीच्या मागणीनुसार नगरसेविका संजना समीर कदम यांच्या प्रयत्नातून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मिशन कवच कुंडल अंतर्गत कोविड १९ मोफत लसीकरण मोहीम संपन्न झाली.
खारघर सेक्टर १६, वास्तुविहार के एच २ सोसायटीमध्ये सदर लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांनी लाभ घेतला. वास्तुविहार सोसायटीचे अध्यक्ष तथा भाजप युवानेते समीर कदम ,सचिव अरुण म्हात्रे, खजिनदार आजिनाथ वायभासे आदींनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.