खारघर चौकाला जैन मंदिर चौक नामकरण
पनवेल, प्रतिनिधी : खारघर जैन समाजाच्या वतीने खारघर चौकाला जैन मंदिर चौक असे नामकरण करण्यात आले. पनवेल मनपा माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते चौकाचे उदघाट्न करण्यात आले.
खारघर सेक्टर 19 मध्ये भव्य असे जैन मंदिर साकारत आहे.खारघर येथील सदर मंदिराच्या जवळील चौकाचे नामकरण संपन्न झाले. खारघर येथे जैन समाजाच्या वतीने क्षमावाणी पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकल जैन समाज खारघर चया वतीने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जैन समाज सोहळ्याला नगरसेविका नेत्रा पाटील ,भाजप रायगड सचिव ब्रिजेश पटेल, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ट्रस्टचे चेअरमन : आर पी जैन, सचिव : सचिन शहा, खजिनदार : संजय सोनी तर जैन समाज महिला अध्यक्षा रितू जैन, सचिव प्रमिला जैन आणि खजिनदार स्मिता सेठी, उप खजीनदार स्नेहल शहा, सह सचिव राजश्री जैन, सह सचिव बॉबी जैन आदींचा कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. खारघर जैन युवा जितू जैन, विपीन जैन, शैलेश जैन, प्रियांक जैन, अभिषेक जैन यांचा समावेश आहे. जैन समाजाचा सर्वांगीण विकास करणार अशी भावना यावेळी सचिन शहा, सचिव : जैन सेवा ट्रस्ट यांनी व्यक्त केली.
Be First to Comment