Press "Enter" to skip to content

आपत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी मदतीला धावले !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवसेवा : मुसळधार पाऊस आणि वादळ यामुळे ५ व ६ ऑगस्ट रोजी सर्वत्रच मोठा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. खारघर शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. रहदारीला मोठी अडचण निर्माण झाली. अशा आपतत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीला धावून गेले.

वादळी अतिवृष्टीने पनवेल महानगरपालिका परीसरामध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाली.अशा बिकट परिस्थितीत खारघर राष्ट्रवादी काॅग्रेंसचे पदाधिकारी भाऊसाहेब लबडे जेष्ठ नागरीक सेल पनवेल जिल्हा प्रमुख , कृष्णा मर्ढेकर प्रभारी खारघर व पनवेल (शहर)जिल्हा सह-सचीव, महेश कुमार राऊत प्रभाग ५ अध्यक्ष खारघर, गणेश पाटील जिल्हा सचिव सामाजिक न्याय विभाग, प्रदीप पाटील युवा कार्याध्यक्ष खारघर यानी ज्या -ज्या ठीकाणी चक्री वादळामुळे रस्त्यावर ठिकाणी झाडे कोलमडून पडली होती व वाहतुक ठप्प झाली होती,अशा ठिकाणची झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. रात्री उशिरा अंधार पडला तरी पालिका प्रशासनाची प्रतीक्षा न करता सामाजिक जबाबदारी पार पाडली.

कोकण दर्पण

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »