Press "Enter" to skip to content

पनवेलच्या नागरी प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आढावा बैठक घ्यावी ! खासदार सुनील तटकरे !

  • आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये
    राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढणार !

पनवेल : सिडको भवनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जशी नागरी प्रश्नावर चर्चा बैठक आयोजित केली, तशीच पनवेलच्या नागरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमध्येे आढावा बैठक घ्यावी, या विषयी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याना सुचविणार असल्याचे रयगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कळंबोली येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश , कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड आदी उपस्थित होते.
कळंबोली येथे राष्ट्रवादीची आढावा बैैठक संपन्न झाली. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री तटकरे पत्रकारांशी बोलत होते. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पनवेलमध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जागा वाटप हे योग्य वेळेला होईल. पक्ष अधिक बळकट, मजबूत करण्यासाठी आजची ही पनवेल शहर आणि ग्रामीण अशी आढावा बैठक आयोजित केली होती. महापालिका प्रभाग निहाय व जिल्हा परिषद-पंचायत समिती प्रभागनिहाय, मतदान केंद्रनिहाय चर्चा करण्यात आली.

भाजपा हा आमचा राजकीय विरोधक आहे. जेव्हा चार पक्षांची महाविकास आघाडी असते, तेव्हा मतमतांतर तसेच समज-गैरसमज होतात, याचं निराकरण केले जाते; मात्र कुणाला टार्गेट केले जात नाही. पनवेलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप अशी चार पक्षांची महाविकास आघाडी असून आगामी निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतच राहील, असे शेवटी खा. सुनील तटकरे यांनी सांगितले.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »