Press "Enter" to skip to content

लोककार्यात नगरसेविका नेत्रा पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न ! सभागृहनेते परेश ठाकूर यांचे गौरवोदगार !

पनवेल : खारघर शहर आणि प्रभाग क्रमांक ४ मधील नागरी विकासकामे असतील किव्हा सार्वजनिक व समाजोपयोगी उपक्रम असोत, लोककार्यात नगरसेविका नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु असतात, असे गौरवोदगार पनवेल मनपाचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी खारघर येथे एका कार्यक्रमात केले.
खारघर प्रभाग क्रमांक ४ मधील स्थानिक नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या स्थानिक नगरसेवक निधीतून खारघर सेक्टर १९ ते मुर्बी गावादरम्यानच्या मुख्य रस्त्यावर दोन हायमास्ट लावण्यात आले आहेत. सदर हायमस्टचा लोकार्पण सोहळा सोमवारी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी परेश ठाकूर यांनी खारघरच्या एकूणच विकास कामांबाबत प्रकाश टाकला. यावेळी भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, भरत कोंढाळकर, जगदीश ठाकूर तसेच रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ४ मधील मुर्बी गावाजवळून जाणारा सदर रस्ता अनेक दिवस अंधारात होता. त्यामुळे रात्रीच्या वेळात महिलांना ये-जा करताना असुरक्षितता वाटत होती. अंधाराचा फायदा घेऊन काही अनुचित प्रकार घडण्याची भीती निर्माण झाली होती, मात्र, हायमास्ट लाइट्समुळे संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला आहे, आता नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी सुटकेचा निश्वास सोडला, एक चांगले काम नगरसेवकनिधीतून झाल्याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया नगरसेविका नेत्रा पाटील यांनी यावेळी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली. यावेळी सामाजिकनेते किरण पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »