Press "Enter" to skip to content

नगरसेविका नेत्रा पाटील यांनी केला स्वच्छता दूतांचा सन्मान !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा ५ वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून खारघर येथील नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पनवेल महापालिकेतील स्वछता दूतांचा सन्मान केला. खारघर विभागात कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक नेते किरण पाटील,भाजप उपाध्यक्ष दिलीप जाधव, संदीप एकबोटे, भरत कोंडाळकर, अल्पना डे, दयाभाई गोगरी, मेघनाथ ठाकूर, स्वच्छता निरीक्षक अतुल मोहकर, संजय भोईर आदी उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »