पनवेल : मानसीकता बदला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने आपण जे काम करतोय त्याला सर्वस्व झोकून देउन कष्ट करा असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी खारघरमध्ये आज झालेल्या समारंभात विद्यार्थ्यांना दिला.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्स महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ (सोमवार, दि. ११) मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक संपन्न झाला. त्यावेळी डॉ. विजय जोशी बोलत होते.
या समारंभात ज्या विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम घेऊन उज्वल यश संपादीत केले आहे अश्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला आमदार तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, सचिव डॉ.सिध्देश्वर गडदे, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संजय मराठे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.पाटील, यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विजय जोशी यांनी सांगीतले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात शिकत राहिजे पाहिले आपले कौशल्य वाढवले पाहजे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून आपले समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने काम करणे गरजचे आहे. तसेच एकदा हातातून गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळे वेळेचा वापर योग्य पद्धतीने कारा असा सल्ला दिला. तसेच आपला संबध सकारात्मक लोकांसोबत ठेऊन व संवाद कौशल्य वाढवा हे आयुष्य जगताना महत्वाचे आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व आयुष्या मध्ये प्रगती करत रहा अश्या शुभेच्छा दिल्या. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना असा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
विश्वासाने सर्वस्व झोकून देउन कष्ट करा- डॉ. विजय जोशी ! रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्स पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ !
More from KokanMore posts in Kokan »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »