उलवे येथे मोफत प्राणिक हीलिंग
आरोग्य शिबिराचे आयोजन !
पनवेल. प्रतिनिधी : उलवे येथे प्रथमच मोफत प्राणिक हीलिंग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगा विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत स्पिरिचवल बुड्डीज ग्रुपच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
रविवारी ३ सप्टेंबर रोजी ईश्वर ऑरा, पहिला मजला प्लॉट नंबर १३ ए, सेक्टर ८ , उलवे येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११ वाजता, दुपारी १२.३० वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ४.३० वाजता अशा चार सत्रात सदर शिबीर होणार आहे.
प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे मात्र काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेले उपचार शास्त्र म्हणजे प्राणिक हीलिंग होय. मानवी शरीरात कार्य नियंत्रित करणाऱ्या प्रत्येक मानवी शरीराभोवती अस्तित्वात असणाऱ्या ऊर्जा वलयाचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. प्राणिक हिलिंगमध्ये प्राण शक्ती किंव्हा ऊर्जेचा वापर व्याधी निवारण्यासाठी केला जातो. त्यामुळे या शिबिराचा लाभ ग्यावा, असे आवाहन मनीषा वाडेकर यांनी केले आहे. सदर शिबिरात सहभाग घेण्यासाठी ९८३३८३१६१९,/ ७०२१८९३५२७,/ ९००४०५२५३४ या भ्रमणध्वनींवर आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Be First to Comment