पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत प्रभाग क्र १८ मधील स्वच्छता दुतांचा सत्कार विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेत्यांनी स्वच्छता दुतांचे सन्मान करत कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल आभार व्यक्त केले.
आपला परिसर स्वछ व सुंदर ठेवण्यात स्वच्छता दुतांचा मोठा वाटा असतो. स्वच्छता दुत हे नेहमी आपले शहर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. याच गोष्टीची जाणीव ठेवून पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी स्वच्छता दुतांचा सत्कार केला. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील, पालिका अधिकारी शैलेश गायकवाड, स्वच्छता दूत यावेळी उपस्थित होते. अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दुतांचा सन्मान केला. कोरोना काळात आपण सर्वजण घरात होतो. मात्र हे स्वच्छतादूत रोड व दररोज स्वच्छतेचा ध्यास घेऊन काम करत होते अशा महिला बंधू-भगिनींचा सन्मान आज करण्यात आला. देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेलं योगदान अमुल्य आहे, त्यामुले स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं यात भाग घ्यावा असे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सांगितले.