पनवेल : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल शहरजिल्ह्याच्या वतीने आणि पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर एन यादव यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी कांग्रेसचे पनवेल शहर जिल्हा नवनिर्वाचित सरचिटणीस कृष्णा मर्डेकर आणि पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष असिफ पटेल यांचा खारघर येथे जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब लबडे जेष्ठ नागरीक पनवेल शहर जिल्हा, आर एन यादव उपाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा, किशोर देवधेकर सामाजिक न्याय जिल्हाद्यक्ष , शैलेंद्र हाकंर सामाजीक न्याय जिल्हासचिव, ज्ञानेश्वर शिंदे खारघर शहर सामाजीक न्याय , यशवंत लोखंडे कामोठे शहर अध्यक्ष सामाजीक न्यायं, हरीश ठोबंरे प्रभाग ६ अध्यक्ष सामाजिक न्याय कामोठे, महेशकुमार राऊत प्रभाग ५ खारघर अध्यक्ष आदी उपस्थित होते.