पनवेल : पनवेल तालुक्यातील खारघर खाडी भागात आज (दि.15 नोव्हेंबर) रोजी अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव आणि पनवेल उपविभागीय अधिकारी, राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांच्यासह मंडळ अधिकारी सुनील पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.
या कारवाईत या पथकाने दोन बोटी व वाळूचे हौद नष्ट केले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.
खारघर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई ! दोन बोटी आणि वाळू हौद केले नष्ट !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »