Press "Enter" to skip to content

पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापची मोर्चेबांधणी सुरु ! खारघर येथे जनसंपर्क कार्यालय सुरु !

पनवेल : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा सक्रिय झाला असून खारघर येथे जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. शेकापचे नेते तथा आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते खारघर येथील कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. खारघर येथे नागरी सुविधा, उपज़िल्हा रुग्णालय, उप निबंधक कार्यालय तसेच पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु कारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी दिले.

शेकापला हवे खारघरमध्ये खंभीर नेतृत्व !
पनवेल मनपाच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने शेकापला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आणि पनवेल विधानसभा क्षेत्रात अनेक राजिक्य बदल झाले. पनवेलमध्ये झालेल्या अनेक राजकीय भूकंपाचे धक्के शेकापला खावे लागले आहेत. अनेकांनी भाजपात पक्षांतर केले.त्यामुळे शेकापच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र, खारघरमधील नेत्यांनी देखील मागील पाच वर्षात शेकापच्या वाढीसाठी काहीही कार्यक्रम राबविले नाहीत. शेकापच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील याकडे विशेष लक्ष दिले नाही. मात्र, पनवेल मनपाच्या निवडणुकीचे लक्ष ठेवून आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम म्हात्रे आणि शेकापचे नेते काशिनाथ पाटील यांनी कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर करण्यासाठी मोहीम आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेकापने खारघर सेक्टर १२ येथे जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात केली आहे. खारघर येथे जनसंपर्क कार्यालय तर सुरु झाले, मात्र त्यासाठी शेकाप आता खारघरसाठी खंबीर नेतृत्व आहे. याअगोदर खारघर शहराध्यक्षपद राम करावकर आणि अशोक गिरमकर यांना विभागून देण्यात आले होते. आता, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारे खमके नेतृत्व शेकापला खारघरमध्ये हवे आहे. आता शेकापचे नेते नवीन चेहरा खारघरला देतील कि आहे तेच चेहरे पुढे आणतील, हे पुढील काही काळात स्पष्ट होणार आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »