लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विशेष उपक्रम !
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका संजना समीर कदम यांच्या वतीने वास्तूविहार से.१६ खारघर येथील वाचनालयात प्रभागातील नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभागातील गरजु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोशल डिस्टन्ससिंग नियमांचे पालन करीत तोंडावर मास्क लावून सगळ्यांना विद्यार्थ्यांना वह्या व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. आज कोरोना महामारीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे अशा परिस्थितीत नगरसेविका संजना कदम आणि युवनेते समीर कदम यांनी राबविलेल्या सदर उपक्रमामुळे पालकांनी आणि नागरिकांनी कौतुक केले.
सुमारे ५०० नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले तसेच ३५० विद्यार्थ्यांना वहय़ावाटप करण्यात आले. नागरिकांनी योग्य पद्धतीने सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत हे कार्य पार पाडल्याने नगरसेविका संजना समीर कदम यांनी नागरिकांचे आभार मानले व यापुढे देखील शासन व प्रशासन यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन देखील केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले .
कोकण दर्पण