प्रतिमा जाळत केले आंदोलन…
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणार्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून आज पनवेलमध्ये युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख प्रदेश सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल कार्याध्यक्ष शाहबाझ पटेल व सहकाऱ्यांनी प्रतिमेला जोडे मारत आणि ती प्रतिमा जाळत आंदोलन केले.
मी देवेंद्र फडणवीस यांचा मुर्ख गुलाम’ अशा आशयाचे पोस्टरवर लिहून त्यावरील आमदार गोपीचंद पडळकर यांचा फोटोला राष्ट्रवादी युवकांनी जोडे मारत आणि जोरदार घोषणाबाजी करत खारघर येथे हे आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणार्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोकण दर्पण.