नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नवी मुंबईत उभारावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मल्लिकार्जुन पुजारी यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देशात इतिहासात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक न्यायाच्या , समतेच्या त्या पुरस्कर्त्या होत्या. मात्र, त्यांच्या ऐतिहासिक योगदानाच्या खाणाखुणा सांगणारे, त्यांच्या स्मृती जपणारे स्मारक नाही. पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन वाशी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रेरणादायी स्मारक बांधावे, अशी मागणी पुजारी यांनी केली आहे.
कोकण दर्पण.