पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल मनपा क्षेत्रातील तळोजा गावामध्ये पावसाळ्यात मलेरिया, डेंगू सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तळोजा गावामध्ये फवारणी करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांच्या पाठपुराव्याने तळोजामध्ये फवारणी करण्यात आली.
कोरोना लढाईत शहबाज पटेल नेहमीच आपला सहभाग नोंदविला आहे. महेबूब शेख प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या अवाहणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष फारुकभाई पटेल,व पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून तळोजा गाव येथे मलेरिया व डेंग्यू हे साथीचे आजार पसरू नयेत म्हणून औषध फवारणी करण्यात आली. तळोजा गावामधून शहबाज पटेल यांचे कौतुक करण्यात आले.
याप्रसंगी युवक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण दर्पण