पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर संपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते शुक्रवारी संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी,पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील, महिला प्रदेश सरचिटणीस व पनवेल शहर जिल्हा निरीक्षका भावानाताई घाणेकर,पनवेल शहर कार्यध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे, पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष सुरेश रांजवण, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस कृष्णा मर्ढेकर, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम, खारघर शहर उपाध्यक्ष रघुनाथ पुरोहित, युवक प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, पनवेल युवक कार्याध्यक्ष शहाबाज पटेल, नगरसेवक विजय खानावकर, महादेव पाटील, पनवेल तालुका रोजगार स्वयंरोजगार अध्यक्ष संतोष शेट्टी, राष्ट्रवादी ओवे कॅम्प अध्यक्ष अरविंद जाधव, राष्ट्रवादी महिला पनवेल अध्यक्षा नेहा पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.