राम भोस्तेकर / माणगाव : माणगांव तालुक्यातील महत्वाचा समाजला जाणारा मोरबा जि प मतदार या मतदार संघात होणाऱ्या ११ विकासकामांची उदघाटने व भूमीपूजने ४ डिसेंबर रोजी शेकाप आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाची जाहीर सभा रानवडे गाव येथील गणेश मंदिर सभामंडपात घेण्यात आली.ही विकासकामे आमदार जयंत पाटील माजी आमदार पंडित शेठ पाटील जिल्हा चिटणीस अस्वाद शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि प सदस्या आरतीताई मोरे, माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांच्या प्रयत्नाने साकार होत आहेत असे मत मनोगतात रमेश मोरे यांनी व्यक्त केले आहे. या कामात एकूण ११ विकासकामांची भूमिपूजनांचा यामध्ये समावेश आहे त्यामध्ये निवाची नळेफोडी येथील रस्ता डांबरीकरण करणे, चांदोरे येथील कुणबी समाज सभागृह दुरुस्ती, पळसप येथील रस्त्याचे कार्पेट करणे, डोंगरोली वरचीवाडी येथील रस्ता डांबरीकरण करणे, मोर्बा येथे संरक्षक भिंत बांधणे,मोर्बा राऊत मोहल्ला येथील रस्ता डांबरीकरण करणे, मोर्बा येथे सामाजिक सभागृह बांधणे, मोर्बा मराठा आळी सामाजिक सभागृह बांधणे, राजीवली येथे सामाजिक सभागृह बांधणे, राजीवली येथील रस्ता डांबरीकरण करणे, उमरोली खरवली नळपाणी योजना या विकासकामांचा समावेश आहे.
शेकाप पक्ष हा मतांसाठी लढणारा पक्ष नाही तर ,लोकांच्या हितासाठी लढणारा पक्ष आहे असे मत आमदार जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.तसेच या जी प मतदारसंघात रमेश मोरे यांनी शेकाप पक्ष वाढवला त्याबद्दल कौतुक करण्याचे देखील आमदार जयंत पाटिल विसरले नाहीत.या कार्यक्रमाकरिता आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या समवेत माजी जी प सदस्य अस्लमभाई राऊत,जे बी सावंत एज्युकेश सोसायटी कार्यवाह नानासाहेब सावंत,चांदोरे ग्राम पंचायत सरपंच तृप्ती चांदोरकर, माणगांव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे,जेष्ठ कार्यकर्ते अशोक गायकवाड,विजय आमरे,गोविंद पवार यांच्या सह मोरबा विभाग जि प मतदार संघ, व रानवडी गाव ,बाट्याची वाडी ,एकंदरीत मोरबा जि प मतदार संघातील असंख्य नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून उपस्थित होते. यावेळी मोरबा जि प मतदार संघाच्या कार्यक्षम जी प सदस्या आरती मोरे व तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी आमदार जयंत पाटिल व जि प सेस फंड यातून बहुतांशी निधी या मतदारसंघात वापरल्याने त्यांचे तोंडभरून कौतुक केले.
माणगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत भाई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजने संपन्न !
More from KokanMore posts in Kokan »
More from RaigadMore posts in Raigad »