Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीने खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करीत वेधले प्रशासनाचे लक्ष ! खड्डे तात्काळ बुजविण्याचे केली मागणी !

पनवेल : संपूर्ण खारघर शहरात पडलेले मोठमोठे खड्डे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अपघातजन्य परिस्थितीकडे पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहराच्या वतीने खारघर येथील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या आंदोलनाद्वारे खारघर मधील रस्त्यांना वाचवा, रस्त्यातील खड्डे तात्काळ बुजवा , नागरिकांचे जीव वाचवा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली.
खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांच्या नेतृत्वाखाली युवती पनवेल जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण ,कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा युवक शहबाज पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांच्या प्रयत्नातून खारघर शहरातील धोकादायक खड्ड्यांचा वार्षिक वाढदिवस म्हणून  खड्ड्यांवर  रांगोळी काढत  व पुष्पगुच्छ देऊन निर्देशनात आणण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होता.
खारघर शहर हे आधुनिक स्मार्ट शहर म्हणून नियोजन आखलेले असले तरी करदात्याकडून आर्थिक भुर्दंड लादत कुठल्याही प्रकारची सुरक्षित आधुनिक लोकसेवा न देता  दुर्लक्ष करत करदात्यांचा पोषण न करता शोषण करत असल्याचे अनुभव काही वर्षा पासून खारघरकर सहन करत आहे .पनवेल पालिका प्रशासनाने तर सिडको कडून प्रशासकीय जवाबदारी स्वीकारण्याच धाडस करत करदात्याना अतिरिक्त कर वाढ करून  शोषण करण्याच्या मानसिकतेत  साथ देत असल्याचे चित्र दिसते. आघाडी सरकारने संबंधित बाबतीत बैठक घेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ह्यांच्या अध्यक्षतेखाली  सिडकोच्या अधिकारी प्रशासकीय नियोजना वर अंकुश आणण्याचे महत्वपूर्ण निर्णया घेत असल्याचे चित्र  सिडको भवनावरील अनेक बैठकीत दिसते .
पनवेल शहर जिल्हा युवती अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले की  अशा प्रकारचे जनहितार्थ कार्यक्रम सिडको व पालिका प्रशासन जो पर्यंत  लक्ष देत नाही व नागरिकांच्या अडचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत पनवेल महानगर पालिकेच्या प्रत्येक प्रभागांमध्ये अशा प्रकारचे लक्षवेधी कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस महिला युवती वर्गाकडून  सतत केले जातील.खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे यांनी सिडको प्रशासनाला आव्हान करत सांगितले की करदात्यांकडून ज्या अधिकाराने कर स्वरूपाचे आर्थिक भार देतात त्या अनुषंगाने  प्रशासनाने करदात्यांना सुरक्षित रस्ते, नियमित पाणी, लाईट ,उद्यान अशा प्रकारच्या सेवा द्याव्यात अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस युवती आपल्या आंदोलन, मोर्चाद्वारे आपले हक्क संघर्ष करून आपले हक्क मिळवेल. खड्या चे बर्थड्डे म्हणून जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील ह्यांच्या मार्गदर्शना नुसार सिडकोला लक्ष वेधत खारघर शहराध्यक्ष बळीराम नेटके ह्यांच्या उपस्थितीत पनवेल जिल्हा युवती पनवेल शहर  अध्यक्षा प्रज्ञा चव्हाण  ,जिल्हा युवक कार्याध्यक्ष शेहबाज पटेल, खारघर शहर युवती अध्यक्षा रेणुका पगारे ,पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर.एन.यादव, रोजगार स्वयंरोजगार पनवेल शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, युवक सचिव पनवेल शहर जिल्हा चांद शेख ,खारघर शहर सरचिटणीस संतोष आसवे,खारघर सरचिटणीस मनीष कुळे, युवा कार्यकर्ता आसिफ पटेल तसेच राष्ट्रवादी महिला युवती उपाध्यक्ष शैला गवारी, प्रेरणा गावंड खारघर शहर युवती सरचिटणीस तसेच निधी मालविया, चांदणी कामणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »