Press "Enter" to skip to content

श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात !

श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात

नांदेड, (प्रतिनिधी)- येथील श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव प्रा. डॉ. देवदत्त देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्राचार्य डॉ. विकास कदम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस त्याचबरोबर कामगार दिनाचे औचित्याने यावेळी डॉ. देवदत्त देशपांडे यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे प्रारंभी पूजन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर यावेळी सामूहिकरीत्या महाराष्ट्र गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ सादर करण्यात आले. कार्यक्रमाला जागृती सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव आनंद भोरगे, माजी सैनिक टी. एस. गायकवाड, प्रा. यशवंत कदम, व्यवस्थापक विलास वाळकीकर, प्रा. संजय नरवाडे, प्रा. अमोल धुळे, प्रा. विपीन कदम, प्रा. शारदा कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.