Press "Enter" to skip to content

स्वच्छ भारत अभियान ! पनवेल महानगरपालिका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर !

पनवेल महापालिकेचा दिल्लीत गौरव
१ते १० लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशांमध्ये २७ वी रॅंक मिळाली, तर राज्यामध्ये २ री रॅंक !

पनवेल : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशभर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१ , स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार आज नवी दिल्लीमधील विज्ञान भवनात स्वच्छ अमृत महोत्सवामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद,केंद्रीय सचिव श्री.दुर्गाशंकर मिश्रा उपस्थितीमध्ये केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री श्री.हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेस वितरीत करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल, आयुक्त श्री.गणेश देशमुख,उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, ,महिला बालकल्याण समितीच्या सभापती मोनिका महानवर, नगरसेवक गणेश कडू, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

याबरोबरीने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पनवेल महापालिकेला १ते १० लोकसंख्येच्या शहरांमध्ये देशांमध्ये २७ वी रॅंक मिळाली, तर राज्यामध्ये २ री रॅंक मिळाली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत यावर्षी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण-संवर्धनाचे संदेश प्रसारित करणाऱ्या आकर्षक रंगचित्रांनी सजलेली भिंतीचित्रे, शहरातील शौचालये शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर, सायकल रॅली, विविध टाकाऊ वस्तूंसाठी रिड्युस, रियुझ, रिसायकल चे स्वच्छता रथ महापालिकेने बनवले आहे. पनवेल महानगरपालिकेच्या लोकप्रतिनीधी ,अधिकारी, कर्मचारीवृंदाने व स्वच्छता मित्रांनी केलेले स्वच्छताविषयक काम आणि त्याला नागरिकांचा लाभलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पनवेल महानगरपालिकेस स्वच्छतेचा हा बहुमान प्राप्त झालेला आहे.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »