पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : : कमी दाबाने पाणी, खड्डेमय रस्ते आदी विविध नागरी प्रश्नांकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या खारघरवासीयांनी सिडको विरोधात हल्लाबोल आंदोलन केले. भाजप युवामोर्चाचे सरचिटणीस अमर उपाध्याय आणि स्थानिक नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जनता रस्त्यावर उतरली आणि सिडको अधिकाऱ्यांना जाब विचारला.
खारघर प्रभाग ५ मधील सेक्टर ३ आणि ४ परिसरातील नागरिकांना नागरीप्रश्नांनी हैराण करून सोडले आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे लेखी आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी दिले, मात्र आता पर्यंत त्याची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल केली, असा घणाघात नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी केला. पुढील महिल्यापर्यंत नागरी प्रश्न नाही सुटले तर सिडकोच्या सीबीडी येथील मुख्यालयावर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा अमर उपाध्याय यांनी यावेळी दिला.
कोकण दर्पण