पनवेल : पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका लीना गरड यांचे भारतीय जनता पार्टीतून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर खारघर प्रभाग पाच मधून नगरसेविका म्हणून लीना गरड विजयी झाल्या. मात्र त्यांनी सतत उघडपणे पक्षविरोधी कारवाई केली आहे आणि तशा सातत्याने तक्रारी विभागातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पक्षश्रेष्टींकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी लीना गरड यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्या संदर्भात मंगळवारी निलंबन पत्र लीना गरड यांना पाठविण्यात आले आहे.
लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन !
More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
More from RaigadMore posts in Raigad »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »
More from ThaneMore posts in Thane »