पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांचे केंद्र म्हणजे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होय. मागील दोन वर्षांपासून खारघर सेक्टर १५ येथे कार्यरत असलेलले खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे.
खारघर शहर हे मोठ्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहराची वैद्यकीय गरज ओळखून मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. सरबजीत कोहली आणि डॉ. सागर गुंडेवार यांनी खारघर सेक्टर १५ येथील द क्राऊन इमारतीत १२ हजार स्केअर फुटाच्या प्रशस्त जागेत ७ मे २०१९ रोजी खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली. डॉ सरबजीत कोहली हे ऑर्थोपेडिक सर्जन असून मागील २२ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. डॉ. सागर गुंडेवार हे प्लास्टिक सर्जन असून मागील २० वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहेत. नवी मुंबई, पनवेल, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सरबजीत कोहली आणि डॉ. सागर गुंडेवार यांच्या वैद्यकीय सेवेचा लाभ आता खारघरवासियांना होत आहे.
खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे २४ तास वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल आहे. बाह्यरुग्ण कक्षासह अर्थात ओपीडीबरोबर ३५ बेड्चे हॉस्पिटल असून ५ आयसीयू बेड्स आहेत. हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. यामध्ये फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, कॅन्सर तज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ, प्रसूतिगृह, इंडोस्कोपी सर्जरी , दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, ईसीजी, एक्सरे, २ डी इको, रक्त तपासणी आदी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात कॅशलस आरोग्य सेवा उपलब्ध आहे. रुग्णालयाद्वारे २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली आहे.