Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीचे संघटन खारघर शहरात मजबूत करण्यासाठी काम करावे : राष्ट्रवादीचे नेते सूरदास गोवारी यांचे प्रतिपादन !

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खारघर शहर कार्यकारिणी जाहीर !

पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद खारघर शहरात वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, कोणतेही मतभेद न बाळगता राष्ट्रवादीचे संघटन वाढवावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी यांनी खारघर येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,खारघर शहर कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी, सामाजिक न्यायविभाग पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष किशोर देवदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
खारघर शहर कार्यकारिणीमध्ये राहुल कोळी खारघर शहर उपाध्यक्ष, बलविंदर सिंग सैन्नी,खारघर शहर उपाध्यक्ष, मनोहर सत्रे खारघर शहर उपाध्यक्ष, रघुनाथ राजपुरोहित खारघर शहर उपाध्यक्ष, संतोष आसबे खारघर शहर सरचिटणीस, मनीष कुले, प्रभाग ३ अध्यक्ष नजीर पटेल, अजर पटेल सेक्टर ३० अध्यक्ष, आदींचा समावेश आहे. यावेळी पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सुरेश रांजवन यांचा खारघर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खारघर मधील मध्यवर्ती कार्यलयात सन्मान करण्यात आला.
यावेळी पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष सुरेश रांजवन, पनवेल शहरजिल्हा उपाध्यक्ष आर.एन. यादव, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस नागेश पवार, पनवेल शहर जिल्हा रोजगार स्वयरोजगार विभाग अध्यक्ष संतोष शेट्टी, युवक पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज़ पटेल,ओबीसी नेते विजय मयेकर,पनवेल शहर जिल्हा महिला कार्यध्यक्षा अनुराधा रंगारी,पनवेल शहर जिल्हा सहसचिव कृष्णा मर्ढेकर,महेंद्र पाटील, युवती खारघर शहर अध्यक्षा रेणुका पगारे, प्रेरणा गावंड, शैला गवरी,सतीश अवघडे,महेशकुमार राऊत इत्यादि उपस्थित होते.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »