पनवेल : भाजप युवा मोर्चा खारघर – तळोजा मंडल अध्यक्ष विनोद घरत यांनी दुर्गामातेचे दर्शन घेतले. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक ३ मधील खुटुकबांधन येथील नवदुर्गा मंडळाच्या नवरात्रोत्वास भेट देऊन विनोद घरत यांनी देवीमातेचे दर्शन घेतले. संपूर्ण जगावरील कोरोनाचे संकट दूर करून मानवजातीला सुखी ठेव, असे साकडे दुर्गा मातेकडे केले.










