नवी मुंबई : २५ ते २९ नोव्हें अशी २६ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा करूक्षेत्र हरियाणात सुरू असुन यात भारतभरातून प्रत्येक राज्याचे विजेते सहभागी झाले असुन त्यात महाराष्ट्र कडुन नवी मुंबई ची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने सबज्युनिअर गटात ३० किमी अटीतटीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत सुवर्ण पदक मिळवले असुन प्रथमच महाराष्ट्राला हे पदक मिळाले आहे .सदरच्या स्पर्धेत भारतभरातून ४२ स्पर्धक सहभागी झाले होते त्यात अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग क्लब चे राज्यस्तरीय विजेते हे त्याचे राज्यातून विजेते हे सहभागी झाले होते करूक्षेत्र येथील या स्पर्धेत रेकॉर्ड करीत स्नेहल शत्रुघ्न माळी रा खारघर हिने सोनी स्पिंग क्लब चे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट राजेंद्र सोनी यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्ण पदक महाराष्ट्राला मिळून दिले आहे येणारे काळात स्नेहल ही भारताकडुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करणार आहे स्नेहल माळी हिने गतवर्षी २५ वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक मिळवले होते स्नेहल माळी हिचे वडील हे नवीमुबंई पोलीस आयुक्तालयात वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत तिचे या यशाबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग , आमदार मंदाताई म्हात्रे ,आमदार प्रशांत ठाकूर ,लोकनेते रामशेठ ठाकूर ,पनवेल महापौर डाॅ कविता चौतमोल व महाराष्ट्र सायकलिंग चे अध्यक्ष प्रताप जाधव वमहाराष्ट्रातील विविध क्रिडा संस्था नी कौतुक केले आहे
राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत नवी मुंबईची स्नेहल माळीला सुवर्ण पदक !
More from KokanMore posts in Kokan »
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »