Press "Enter" to skip to content

सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरणाच्या कामाला वेग !

पनवेल : सिडकोकडील सेवा महापालिकेकडे हस्तांतरणाच्या कामाला वेग मिळाला असून त्यादृष्टीने सिडको अधिकाऱ्यांबरेाबर सेवा पहाणी महापालिका अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकित आयुक्त गणेश देशमुख यांनी संबधित विभागाकडून या पहाणीचा आढावा घेतला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील बहुतांश भाग हा सिडको प्राधिकरणाचा असल्याने त्यांच्याकडील सेवा-सुविधा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सद्य स्थितीत सुरू आहे. या अनुषंगाने गेल्या २७ तारखेपासून सेवा –सुविधा पहाणी कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये रस्ते, फूटपाथ, मलनिस्सारण वाहिनी, एसटीपी प्लॅन्ट, इलेक्ट्रीकल व एच टी कनेक्शन्स,पथदिवे, उद्याने, खेळाची मैदाने, ट्री बेल्ट, होल्डिंग पॉन्ड्स, स्मशानभूमी, रोज बाजार ,अग्निशमन या सेवा लवकरात लवकर महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

याच बरोबर स्वामी नित्यानंद रस्त्याचे रूंदीकरण, शाळा हस्तांतरण, लसीकरण मोहिम, पालिका हद्दीतील अतिक्रमण, प्रस्तावित नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रस्तावित वॉर्ड ऑफिस बांधकाम याविषयांचा आयुक्तांनी आढावा घेतला.

चौकट
असंघटित कामगारांची विकास आयुक्तांकडून सिटीझन सरव्हिस सेंटरच्या माध्यमातून नोंदणी केली जाणार आहे. यासाठी शासनाने ई-श्रम पोर्टल सुरू केलेआहे. पालिकेने असंघटित कामगारांची नेांदणी करण्यासाठी, याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मदत करावी या उद्देशाने सिटीझन सरव्हिस सेंटरचे कोऑर्डिनेटर प्रदिप पवार यांनी या विषयाची माहिती उपस्थित विभागप्रमुखांना दिली.

पनेवल महापालिका क्षेत्रातील कर्मचारी निधी, भविष्यनिर्वाह निधी ,आयकर न भरणारे, १६ ते ५९ वयोगटातील कामगार यांमध्ये नोंदणी करू शकतात. रायगड जिल्ह्यातील लघू उद्योग, गृह उद्योग, मच्छीमार, वीट भट्टी कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले, टेम्पो ड्रायव्हर या अंतर्गत नोंदणी करू शकतात. नोंदणी करण्यासाठी कामगाराचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे, अशी माहिती श्री.पवार यांनी दिली. असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी सिटीझन सर्व्हिस सेंटरला प्रभाग अधिकाऱ्यांनी मदत करावी असे आदेश या बैठकित आयुक्तांनी दिले.

More from KokanMore posts in Kokan »
More from MumbaiMore posts in Mumbai »
More from RatnagairiMore posts in Ratnagairi »